पाकिस्तानात गेल्या चार महिन्यात 25 ते 30 हिंदू मुलींचे अपहरण

857

पाकिस्तानातील सिंध प्रांतातून गेल्या चार महिन्यात तब्बल 25 ते 30 तरुणींचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते खील दास कोहीस्तानी यांनी पाकिस्तानच्या संसदेत ही माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी सिंध प्रांतातील हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा देखील मांडला.

‘गेल्या चार महिन्यात 25 ते 30 हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले आहेत. त्या मुलींबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. हे असे अत्याचार अजून किती सहन करायचे? अजून किती काळ हिंदूंना मृतदेह उचलावी लागणार आहेत? अजून किती वेळ आमची मंदिरं तोडली जाणार? हे असे प्रकार फक्त सिंध प्रांतातील घोटी व उमेरखोटमध्येच का घडत आहेत? हे थांबले नाहीत तर य़ा विरोधातील आग संपूर्ण सिंध मध्ये पसरेल. या घटनांमध्ये ज्यांचा हात आहे अशा काही लोकांना अटक झाली पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांन अशा लोकांवर कारवाई करावी’, असे कोहीस्तानी यांनी संसदेत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या