ग्रॅण्ड हयातमध्ये 250 कामगारांनी केले रक्तदान  

भारतीय कामगार सेना हॉटेल ग्रॅण्ड हयात युनिट आणि ग्रॅण्ड हयात मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला कर्मचाऱयांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या शिबिरात हॉटेलमधील सुमारे 250 कर्मचाऱयांनी रक्तदान केले.

भारतीय कामगार सेना हॉटेल ग्रॅण्ड हयात युनिटच्या वतीने चिटणीस मनोज धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रॅण्ड हयातमध्ये दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबीर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि स्मृतिदिन, गुढीपाडवा असे कार्यक्रम केले जातात. यात दरवर्षी पक्ष निधी म्हणून युनिटच्या वतीने 5 लाख रुपये दिले जातात.  ग्रॅण्ड हयात युनिटच्या या समाजोपयोगी उपक्रमांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमीच काwतुक करतात आणि प्रोत्साहन देतात, असे धुमाळ यांनी सांगितले.

या शिबिराला भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस-आमदार सचिन अहिर, कार्याध्यक्ष अजित साळवी, शिवसेना नेते- खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब, आमदार संजय पोतनीस, माजी नगरसेवक सदा परब, चिटणीस योगेश आवळे, तेजस चांदपुरे, शेरी पाडा, डीटमार कीनलोफर आदी उपस्थित होते.