अडीच हजार परदेशी तब्लिगी जमातीच्या सदस्यांना हिंदुस्थानात 10 वर्षासाठी बंदी

1175

तब्लिगी जमातच्या 2 हजार 550 परदेशी सदस्यांना पुढील 10 वर्षांसाठी हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत तब्लिगी जमातच्या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता.

गृहमंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार 2 हजार 550 तब्लिगी जमातच्या सदस्यांना हिंदुस्थानात येण्यास बंदी घातली आहे. या तब्लिगींना पुढे हिंदुस्थानात प्रवेश मिळणार नाही.


मार्च महिन्यात निझामुद्दीन भागात तब्लिगी जमातने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात जमातचे सदस्य सहभागी झाले होते. त्यानंतर अनेक तब्लिगी आपापल्या घरी गेल्याने कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला.

अनेक तब्लिगी जमातचे सदस्य कोरोना संकटात लपून बसले होते. अनेकांनी मशीद आणि धार्मिक स्थळांमध्ये बेकायदेशीर आसरा घेतला होता. जमातच्या नेत्यांनी महासाथ कायद्याचे उल्लंघ केले होते. तसेच विसा कायदा आणि परदेशी कायद्याची त्यांनी उल्लंघन केले होते. म्हणून गृहमंत्रालयाने कारवाई करत अडीच हजार जमातच्या सदस्यांना हिंदुस्थानात बंदी घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या