रत्नागिरीत 26 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 234 वर

605

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आणखी नवे 26 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 234 वर पोहचली आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजता आलेल्या तपासणी अहवालात 26 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

जिल्ह्यात नवे 26 रूग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 234 वर पोहचला आहे. यापूर्वी 83 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 146 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवडे, दाभोळे, कोंडगाव तसेच रत्नागिरी तालुक्यातील मौजे उक्षी, नाणीज, भंडारपुळे, नाचणे शांतीनगर, तरवळ ही गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या