प्रेमाचा अजब रंग! 26 वर्षांची शिक्षिका 14 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत फरार

3012

प्रेम आंधळे असते किंवा प्रेमाचा रंगच निराळा असतो, असे कायम म्हटले जाते. मात्र गुजरातमध्ये प्रेमाचा अजब रंग पाहायला मिळाला. एक शिक्षिका चक्क आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळूनही गेली. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, गुजरातच्या गांधीनगर भागात एका शाळेमध्ये शिक्षिका असणाऱ्या महिलेचे आपल्या वर्गांतील 14 वर्षीय मुलावर प्रेम जडले. या दोघांमध्ये गेल्या एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळा प्रशासनाने शिक्षिकेला वॉर्निंगही दिली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करत शिक्षिकेने आपले प्रताप पुढेही सुरुच ठेवले. अखेर शुक्रवारी शिक्षिका विद्यार्थ्यांला घेऊन फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे.

महिला शिक्षिका गेल्या बऱ्याच काळापासून माझ्या मुलावर नजर ठेऊन होती आणि त्याची छेडही काढत होती, असा आरोपी मुलाच्या वडिलांनी केला आहे. तसेच आपला मुलगा शुक्रवार 4 वाजल्यापासून गायब असून शिक्षिकाही गायब असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी महिला शिक्षिकेविरोधात कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गांधीनगर येथील कलोल सिटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून शिक्षिका आणि विद्यार्थाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या