महाराष्ट्रात २६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्रात १७ वर्षांमध्ये २६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील १२,८०५ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

राज्यात २००१ ते ऑक्टोबर २०१७ या काळात एकूण २६ हजार ३३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पाटील यांनी सांगितले. यंदा १ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. फक्त बीड जिल्ह्यात यंदा १ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान ११५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या