देशभरात पावसाचा कहर, 269 जणांचा मृत्यू, 42 जण बेपत्ता

297

देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे  पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 269 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 जण बेपत्ता झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक राज्यात लाखो लोक प्रभावित झाले आहेत. शेकडो लोकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता. जसे जसे पाणी ओसरले तसे लोकांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे.

पूर्ण आणि दरड कोसळल्यामुळे सर्वाधिक फटका केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांना बसला आहे. केरळमध्ये आतापर्यंत 115 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमध्ये 62 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरामतमध्ये 35, महाराष्ट्रात 30, उत्तराखंड आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 8, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्येही प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये वीज पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला होता.

केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावासमुळे दरड कोसळल्या. या घटनेत आतापर्यंत 44 जण बेपत्ता झाले आहेत. केरळमध्ये ढिगार्‍याखाली 27 लोक अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कर्नाटकमध्ये 15 जण बेपत्ता आहेत. 

आपली प्रतिक्रिया द्या