बुलढाण्यात 27 रुग्ण कोरोनामुक्त, एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण कोरोनातून झाले बरे

बुलढाणा जिल्ह्यात आज 27 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोतून बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच आज कोरोनाचे 39 रुग्ण आढळले आहेत.

आजपर्यंत 6 हजार 33 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 353 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी 237 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 6033 आहेत. जिल्ह्यात एकूण 742 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 353 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 367 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. आतापर्यंत 22 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या