आश्रम शाळेतल्या 27 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. डहाणूत हा धक्कादायक प्रकार घडला असून सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील 27 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी जेवणातून दुधीची भाजी खाल्ली होती. रात्री उशिरा त्यांना त्रास झाला त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.