बुलढाण्यात 28 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; 21 रुग्णांची कोरोनावर मात

642

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या आणि रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 226 अहवाल मिळाले आहेत. त्यापैकी 198 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून 28 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपिड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 37 तर रॅपिड टेस्टमधील 161 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 198 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

देऊळगावराजा खडकपूरा 1, महात्मा फुले रोड 2, संजय नगर 1, देऊळगावमही ता. देऊळगावराजा 1, दुसरबीड ता. सिंदखेडराजा 2, सुलतानपूर ता. लोणार 2, ठालेगाव ता. लोणार 1, बुलढाणा 1, बालाजी नगर सुंदरखेड 2, धामणगावबढे ता. मोताळा 1, शेगाव 1, दाताळा ता. मलकापूर 1, मलकापूर शक्ती नगर 4, खामगाव शिवाजी वेस 2, शासकीय रुग्णालय क्वार्टर 1, कुंभारवाडा 1, खती ले आऊट 1, सुटाळा 1, जगदंबा रोड 1, अमृत नगर 1 या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 28 नवे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी 21 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मलकापूर 1, पंत नगर 1, डोणगाव ता. मेहकर 1, दाताळा ता. मलकापूर 1, शेगाव ब्राम्हणवाडा 2, बुलढाणा जोहर नगर 1, विष्णूवाडी 2, लोणार 1, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना 1, दिवठाणा ता. चिखली 1, खामगाव देशमुख प्लॉट 2, सती फैल 2, रेखा प्लॉट 3, देऊळगावराजा 1, मेहकर 1 येथील रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत 12,777 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 1190 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 135 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात सध्या 1999 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 1190 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 774 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या