पुनर्मूल्यांकनाचे २८ हजार निकाल रखडले

43

सामना ऑनलाईन । मुंबई

एटीकेटीची तसेच हिवाळी परीक्षा जवळ आली तरी अद्याप पुनर्मूल्यांकनाचे (रिव्हॅल्यूएशन) २८ हजार निकाल रखडले आहेत. त्यामुळे या परीक्षेला बसायचे की नाही, अशा संभ्रमात हजारो विद्यार्थी आहेत. परीक्षा विभागाने येत्या दोन-तीन दिवसांत निकाल जाहीर होतील, असे सांगितले असले तरी तशा काहीच हालचाली दिसत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

ऑनलाईन असेसमेंटच्या मुंबई विद्यापीठाच्या निर्णयामुळे निकाल रखडले. बीएस्सीच्या विद्यार्थ्यांची हिवाळी परीक्षा तसेच एटीकेटीची परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु अद्याप पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागलेले नाहीत. ९० हून अधिक विद्यार्थ्यांचे राखीव निकालही रखडले आहेत. परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनीही याला दुजोरा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या