लोहगाव विमानतळावरून 75 लाखांचे सोने जप्त; तस्कराला अटक

616

दुबईहुन पेस्ट स्वरूपात आणलेले सोने पँटमध्ये लपवून तस्करी करणाऱ्या एकाला सीमा शुल्क विभागाने लोहगाव विमानतळावर अटक केली. त्याच्याकडून तब्बल 75 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. दुबईतून आलेल्या स्पाईस जेटमधून सोने तस्करी केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे यांनी माहिती दिली.

पेनकर जुहीर जाहीद असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. त्याच्याकडून 2 किलो 200 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 75 लाख रुपये आहे. स्पाईस जेटच्या विमानातून दुबई ते पुणे असा प्रवास करीत पेनकरने सोने तस्करी केली. त्यांनतर लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चोरट्या मार्गाने पेस्ट रूपातील सोने प्लॅस्टीकच्या कागदात पँन्टमध्ये ठेवल्याचे तपासणीत आढळून आले. याप्रकरणी पेनकरला अटक करण्यात आली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त डॉ. मोतीलाल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली माधव पालनीटकर, प्रतिभा माधवी यांनी ही कारवाई केली. नागरिकांना अशा तस्करांबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी सीमा शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन सहआयुक्त पतंगे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या