हिंदुस्थानी फिरकीची कमाल; आफ्रिकेचा डाव ११८ धावांत संपुष्टात

26

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अक्षरश: गुढघे टेकले. हिंदुस्थानी खेळाडूंच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका संघाला केवळ ११८ धावांचा पल्ला गाठता आला. युजवेंद्र चहलने या सामन्यात सर्वाधिक ५ विकेट घेतल्यात तर कुलदीप यादवने आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना तंबूत धाडलं. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. युजवेंद्र चहल वनडे सामन्यात सेंच्युरियन मैदानात ५ विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला.

हिंदुस्थानी फिरकीच्या माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या सात फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. आफ्रिकेचे महत्त्वाचे फलंदाज हाशिम आमला, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉकसारखे फलंदाजांना या सामन्याच चांगली कामगिरी करता आली नाही. जेपी ड्युमिनीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही फारसं यश आलं नाही.

मालिकेत हिंदुस्थान १-०ने आघाडीवर आहे. पहिला एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर दुसरा सामनाही जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा हिंदुस्थानी संघाचा प्रयत्न असेल. एबी डिव्हिलियर्सला बोटाच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर कर्णधार फाफ ड्यू प्लेसीही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंची कमी आफ्रिकेच्या संघाला नक्कीच जाणवत असेल.

आपली प्रतिक्रिया द्या