सैन्य भरतीच्या पेपरफुटीप्रकरणी नागपुरातून सैन्य दलाच्या तिघांना ताब्यात घेतले

26

सामना ऑनलाईन, नागपूर

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या सैन्य भरतीच्या पेपरफुटीप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने नागपुरातून तिघांना ताब्यात घेतलं आहे. रवींद्रकुमार,धरमवीर सिंग आणि निगमकुमार पांडे अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही जण नागपूर येथील आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसमधील लिपीक आहेत. या तिघांना सैन्य दलाने आधीच ताब्यात घेतलं होतं, सैन्याच्या ताब्यातून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. २०१६मध्ये रवींद्रकुमार याने पेपरफुटीप्रकरणातील आरोप संतोष शिंदे याला ५० लाखात प्रश्नपत्रिका विकली होती. या तिघांना आज ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच या तिघांच्या भूमिकेबाबत अधिक स्पष्टता येईल.

(सैन्य भरतीचे पेपरफुटीचे प्रकरण काय होते हे सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

आपली प्रतिक्रिया द्या