अहमदाबादच्या अॅडव्हेंचर पार्कमध्ये राईड तुटून तीन ठार, 26हून अधिक जण जखमी

सामना ऑनलाईन । अहमबदाबाद

गुजरातमधील अहमदाबादमधील कांकरिया अॅडव्हेंचर पार्कमध्ये एक राईड तुटून झालेल्या भयंकर दुर्घटनेत तीन जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत 26 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अहमदाबाद अग्निशमनदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी ऱाईडमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले आहे.

रविवार असल्याने कांकरिया अॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दरम्याने सायंकाळी एक राईड सुरू असताना वेगात एका बाजूला कलंडली व त्यात बसलेल्या लोकांना जोरात हिसका बसला. यात तीन जण ठार झाले तर 15 जण जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या