चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू,२० दिवसात तिघांचे बळी

24

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रात मोहाडी-नलेश्वर जंगलात वाघाच्या हल्ल्यात मंदाबाई मोतीराम दांडेकर ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सरपण गोळा करण्यासाठी त्या जंगलात गेल्या असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गेल्या २० दिवसात ३ व्यक्तींचा मृत्यू झालाय.

८ जानेवारीला शेतामध्ये काम करत असताना मीराबाई चौधरी या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ११ जानेवारीला बबिता मेश्राम ही महिला लाकडं तोडायला गेली असताना तिच्यावरही वाघाने हल्ला केला होता. या महिलेचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर २५ जानेवारीला मंदाबाई दांडेकर यांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २० दिवसात झालेल्या या घटनांमुळे हा नरभक्षी वाघ तर नाही ना असा प्रश्न गावकरी विचारायला लागले आहेत. हल्ल्याच्या घटना आणि वाघ नरभक्षी असल्याची शंका यामुळे ग्रामस्थ गावात आणि शेतात काम करायला घाबरायला लागले आहेत. या वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणीही करण्यात येत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या