Goa News- कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, संतप्त जमावाची जाळपोळ

सामना ऑनलाईन, पणजी
गोव्यामध्ये रविवारी सकाळी दोन कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
goa-angry-mob-after-acciden
या अपघातामधील एक कार ही महाराष्ट्र पासिंगची असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर संतापलेल्या जमावाने ही गाडी जाळून टाकली आहे.
goa-accident-burnt-car
उत्तर गोव्यातील चोपडे-शिवोली पुलावर हा अपघात झाला.
goa-morjim-bridge-accident
प्राथमिक माहितीनुसार मोर्जिमचे रहिवासी असलेले फर्नांडीस कुटुंब प्रार्थनेवरून घरी परतत असताना हा अपघात झाला.
morjim-bridge-accident
या अपघातात वडील आणि मुलासह तिघांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
goa-accident-head-to-head
अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी अपघात स्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेली महाराष्ट्र पासिंगची कार संतप्त जमावाने पेटवून दिली.
goa-accident-torched-car
या अपघातामुळे आणि जाळपोळीमुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. जमावाने पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे.