3-idiots मधील ‘दुबे जी’ फेम अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन

देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सिनेजगतातून दु: खद वृत्त आले आहे. अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. घरातील स्वंयपाकघरात पडल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. 3 इडियट्स चित्रपटातील त्यांची लायब्रेरियन दुबे जी ही भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्यांनी अनेक भूमिका आपल्या कसदार अभिनयाने गाजवल्या आहेत. त्यांच्या निधनाने सनेजगतात शोककळा पसरली आहे.

मिश्रा यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, स्वंयपाकघरात घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर बाल्कनीत काम करत असताना हाईराईज इमारतीतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडली त्यावेळी मिश्रा यांची पत्नी सुजैन हैदराबादमध्ये चित्रीकरणात होती. घटनेची माहिती मिळताच त्या घरी परतल्या आहेत. या घटनेने आपण दुःखी असून आपले सर्वस्व हरवले आहे, असे वाटत असल्याचे सुजैन यांनी सांगितले.

मिश्रा यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मिश्रा यांनी चित्रपटासह टीव्ही शोमध्येही काम केले आहे. वो भंवर, उतरन, उडान, सीआईडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनीसह अनेक शोमध्ये त्यांनी कसदार अभिनय केला आहे. तर डॉन, वेल डन अब्बा, 3 इडियट्स, हजारों ख्वाहिशें ऐसी या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.