‘बाहुबली- २’चं तिकीट मिळवण्यासाठी ३ किमीची रांग!

35

सामना ऑनलाईन । हैदराबाद

‘बाहुबली-२’च्या रिलीजच्या काही तास आधी बुधवारी हैदराबादमध्ये बाहुबलीचा फिव्हर चढला आहे. या सिनेमाचा तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरच्याबाहेर गर्दी केली आहे. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरला झाला आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांची सिनेमा पाहण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत आहे. सिनेमाचं तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांना अक्षरश: ३ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. हैदराबादमधील नेकलेस रोडवरील प्रसाद आयमॅक्स थिएटरच्या बाहेर ‘बाहुबली-२’चं तिकीट बुक करण्यासाठी ही रांग होती. हा व्हिडिओ सकाळी ७ वाजता शूट करण्यात आलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या