
लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर भागातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. दुकानाचा पत्रा काढून दोन्ही दुकानातील साहित्य पळवण्यात आले.
सदरील चोरी प्रकरणी अमित सत्यवान पनगुले यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीचे गणेश नगर बेळंबे कॉम्पलेक्स येथे असलेले एस. पी. व्हरायटीज या दुकानाचे व फिर्यादीचे शेजारी असलेले सहयाद्री किराणा दुकान, पेन्सलकर स्नॅक्स व स्विट्स दुकानाचे छताचे पत्रे कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकवुन आत प्रवेश केला. दुकानातील विविध सामान, वस्तु व रोख रक्कम असा एकुण 59,600/- रुपयांचा माल चोरून नेला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी चौगुले करत आहेत.