रत्नागिरीला दिलासा; दिवसभरात 30 रुग्णांना डिस्चार्ज

497

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 30 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात एकही पॉझिटिव्ह रूग्ण सापडला नाही.जिल्ह्यात आतापर्यंत 159 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात शनिवारी मिळालेले सर्व 43 अहवाल निगेटिव्ह आले असून शनिवारी नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. दिवसभरात 30 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 159 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 343 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 13 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 171 रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सध्या 116 ठिकाणी कंटेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 15 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 8 गावांमध्ये, खेड तालुक्यात 16 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 23 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये 2 गावांमध्ये, दापोलीत16 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 8 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 11 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या