बीड पाठोपाठ परभणीत भगर खाल्ल्याने 30 जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

593

बीडमध्ये भगर खाऊन 80 जणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतनाअ परभणीतही भगर खाऊन 30 जणांना विषबाधा झाली आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

परभणी तालुक्यातील डिघोळ या गावी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उपवासासाठी  ग्रामस्थांनी गावातील दुकानातुन भगरीचे पीठ आणुन त्याच्या भाकरी करुन खाल्या. या भगरीच्या भाकऱ्या खाल्यानंतर अनेकांना उलट्या, मळमळ  होऊ लागल्याने गावातील ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने सोनपेठ येथील डॉ. चव्हाण यांच्या खासगी हॉस्पिटल मध्ये  धाव घेत उपचारासाठी दाखल केले. डॉ चव्हाण यांनी तातडीने सगळ्या रुग्णांची पहाणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केले. सोनपेठ येथे तेवीस रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यातील वीस रुग्णांना औषधोपचार करुन घरी पाठले तर तीन रुग्णांना अस्वस्थ वाटत असल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. इतर सात जणांनी गावातच उपचार घेतल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

या घटनेची माहिती कळताच  सोनपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाणे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी डॉ.चव्हाण यांच्या  खाजगी हॉस्पिटल मध्ये धाव घेतली. या वेळी पोलीस जमादार आडे व  भिसे यांनी प्रकरणाची माहिती घेतली. ऐन कोरोनाचे रुग्ण तालुक्यात वाढत असतांना झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या