व्यायाम करताना तरुणीचा मृत्यू

19

सामना ऑनलाईन । वसई

वसईच्या एव्हरशाईन सिटी भागातील ‘एव्हरशाईन जिम’मध्ये व्यायाम करत असताना जेनिडा कार्व्हालो ही ३० वर्षांची तरुणी अचानक कोसळली. जिममध्ये असलेल्या लोकांनी जेनिडाला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल नेले. तिथे तपासून डॉक्टरांनी जेनिडाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. जेनिडाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणात तुलिंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अलिकडेच नाशिकमध्येही अशा स्वरुपाची एक घटना घडली होती. उत्तमनगरच्या एकता चौकातील अजिंक्य लोळगे (१९) व्यायामासाठी उपेंद्रनगर येथील अतुल डेअरीशेजारी असलेल्या जिममध्ये गेला होता. व्यायामास सुरुवात करण्यापूर्वीच चक्कर आल्याने तो मित्राच्या अंगावर कोसळला. जिममध्ये असलेल्या लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले तिथे तपासून डॉक्टरांनी अजिंक्यचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या