परभणीत पोस्कोअंतर्गत फाशीच्या वटहुकमानंतर राज्यातील पहिल्या गुन्ह्याची नोंद

13

सामना ऑनलाईन । परभणी

परभणी येथील गांधी पार्कमध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सय्यद बबलू सय्यद अशरत या नराधमाला रविवारी नानलपेठ पोलिसांनी गजाआड केले. १२ वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणाऱयांना फाशीची शिक्षा देण्याचा वटहुकूम जारी झाल्यानंतर त्याच्यावर दाखल झालेला राज्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. त्याने या गुह्याची कबुली दिली आहे. घरगुती खरेदीसाठी परभणी शहरातील गांधी पार्क येथे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना १८ एप्रिल रोजी दुपारी घडली होती. पीडित मुलगी ही आपल्या आई, वडील आणि भावासोबत खरेदीला आली होती. परंतु ती दुकानाबाहेर थांबलेली असताना नजर चुकवून आरोपी सय्यद बबलू सय्यद अशरत याने मुलीस पळवून नेले. तसेच तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या