शिकागो एअरपोर्टवर 300 प्रवासी अडकले 

अमेरिकेच्या शिकागो एअरपोर्टवर एअर इंडियाचे 300 प्रवासी अडकले आहेत. तांत्रिक कारणामुळे जवळपास 24 तास उलटूनही विमान उड्डाण करू शकले नाही. हे विमान हिंदुस्थानी वेळेनुसार, मंगळवारी शिकागो एअरपोर्टवरून दुपारी दीड वाजता टेकऑफ करणे आणि 15 मार्चला दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी दिल्ली एअरपोर्टवर पोहोचणे  अपेक्षित होते, मात्र तांत्रिक कारणामुळे अजूनही विमानाने उड्डाण केले नाही. प्रवाशांना दुसऱया विमानाने दिल्लीला पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे एअर इंडियाने म्हटले आहे.