गारपिटीमुळे ३०० पोपटांचा मृत्यू

29

सामना ऑनलाईन। तुमसर

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या गारपिटीचा फटका पिकांबरोबरच पक्ष्यांनाही बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत ३०० पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मात्र, मंगळवारी झालेल्या तुफान गारपिटीत या झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. यापैकी ३०० पोपट मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा व विदर्भात होणाऱ्या गारपिटीने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. शेतातली उभी पिक आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे भवितव्यच अंधारमय झाले आहे. त्याचबरोबर या गारपिटीत प्राण्यांबरोबरच अनेक पक्षीही मृत्यूमुखी पडले आहेत. त्यातच येत्या ४८ तासांत पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या