संभाजीनगर जिल्ह्यात 39 नवे रुग्ण; 3385 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

480

संभाजीनगर जिल्ह्यात परीक्षण केलेल्या 781 स्वॅबपैकी 39 रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 9104 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 5355 रुग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 364 जणांचा मृत्यू झाला. सध्या 3385 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 11 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मनपा हद्दीत 21 रुग्ण आढळले
सादात नगर (1), भवानीनगर (1), क्रांती चौक (1), राजनगर (1), चित्तेगाव (1), मिटमिटा (1), बेगमपुरा (1), केसरसिंगपुरा (1), भीमनगर (1), एन चार सिडको (1), मिलकॉर्नर (1), भोईवाडा, मिलकॉर्नर (1), स्वामी विवेकानंदनगर (7), एन-9 सिडको (1), जयसिंगपुरा (1) या भागातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासह ग्रामीण भागात बुधवारी 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये तेलीगल्ली, फुलंब्री (5), लासूर स्टेशन (2) या भागातील रुग्णांचा समावेश आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या