उद्यापासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 31 फेऱया वाढणार

पश्चिम रेल्वेने उद्या शनिवार, 1 ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रकात एसी लोकलच्या 31 फेऱया वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच चर्चगेट ते विरार 48 एसी फेऱया असल्याने एकूण एसी फेऱयांची संख्या 79 इतकी होणार आहे. तर 15 डब्यांच्या 27 नव्या फेऱया चालविण्यात येणार असल्याने 15 डब्यांच्या एकूण फेऱयांची संख्या आता 106 इतकी होणार आहे. 50 फेऱयांचा विस्तार होणार आहे. त्यामुळे एकूण फेऱयांची संख्या 1375 वरून 1383 इतकी होणार आहे.