कर्जाच्या आमिषाने कंपनी मालकाला 32 लाखांचा गंडा, फायनान्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

केमिकल प्लांट सुरू करण्यासाठी भागीदारीतील कंपनी मालकाला 16 कोटींचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी करून फायनान्स अ‍ॅण्ड इन्व्हेसमेंट कंपनीने 32 लाख 39 हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना फेब्रुवारी ते मार्च कालावधीत विश्रांतवाडीतील टिंगरेनगरमध्ये घडली. याप्रकरणी नीलेश उपासनी (48) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंपनी वागळे इस्टेट, ठाणे या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश यांची भागीदारीमध्ये खासगी कंपनी आहे. संबंधित कंपनीच्या नावाने त्यांना केमिकल प्लांट सुरू करायचा होता. प्लांटच्या बांधकामासाठी 16 कोटी रुपये देण्याचे आमिष वागळे इस्टेट, ठाणे फायनान्स कंपनीने नीलेश यांना दाखविले. त्यानुसार फायनान्स कंपनीने विश्वास संपादित करून नीलेश यांच्याकडून 32 लाख 38 हजार रुपये आरटीजीएस करून घेतले. मात्र, फायनान्स कंपनीने दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन केले नाही. त्याशिवाय कर्ज न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एल. आर. सातपुते यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या