अशी ही बनवा बनवीला झाली 33 वर्षे पूर्ण, वाचा चित्रपटाचे धमाल किस्से

तुम्हाला माहित आहे अशी ही बनवा बनवी एका हिंदी चित्रपटाचा रिमेक होता, हा माझा बायको पार्वती डायलॉग कसा आला? लक्ष्मीकांत बेर्डेंना कसली भिती होती, शूटिंगच्या वेळी शांताराम बापू काय म्हणाले?

अशी ही बनवा बनवी या चित्रपटामुळे मराठी चित्रपटात इतिहास घडला होता. 1988 साली प्रदर्शित झालेल्या बनवा बनवीने तेव्हा 3 कोटींचा व्यवसाय केला होता.

या चित्रपटामागची कथा अशी की व्ही शांताराम हे आपल्या निर्मिती संस्था व्ही शांताराम युवा विभाग साठी एक चित्रपट निर्मिती करत होते. शांताराम बापूंनी सचिन पिळगावकर यांना एखादी कथा ऐकवण्यास सांगितले. तेव्हा सचिन पिळगावकर यांनी आत्मविश्वास चित्रपटाची कथा सांगितली. पण शांताराम बापूंना ती कथा आवडली नाही.

नंतर सचिन पिळगावरकर हृषीकेष मुखर्जी यांच्या 1966 च्या बीवी और मकान या चित्रपटाचा रीमेक करण्याच्या विचारात होते. हृषीकेष मुखर्जी यांच्या मंझली दीदी या चित्रपटात सचिन यांनी बालकलाकाराची भुमिका बजावली होती. तसेच सचिन यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या हाताखाली एडिटिंगचे तंत्रही शिकले होते.

सुरूवातीला मुखर्जी यांनी या चित्रपटाचा रीमेक करण्याची परवानगी दिली नव्हती. कारण वीबी और मकान हा चित्रपट फ्लॉप झाला होता. मराठीतही हा चालणार नाही अशी हृषीकेशदा यांना भिती वाटत होती. नंतर सिचिन पिळगावर यांनी खूपच विनंती केली म्हणून हृषीकेशदा यांनी परनवानगी दिली.

नंतर शांताराम बापूंनाही ही कथा आवडली. सर्व शूटिंग मुंबईतच करण्यात आले. होते. सचिन पिळगावकरांनी शांताराम बापुंना एक अट ठेवली होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी तुम्ही सेटवर यायचे नाही अशी ती अट होती. शांताराम बापुंनी ती ऐकली.

हा माझा बायको पार्वती हा डायलॉग खूप गाजला. हा डायलॉग चित्रपटाच्या पटकथेत लिहिलाच नव्हता. हा आपण स्वतःहून उत्सुर्फुतपणे म्हटला असे अशोक सराफ यांनी सांगितले.

नंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. पण कुणीतरी येणार गं या गाण्यासाठी योग्य स्थळ मिळत नव्हते. अखेर शांताराम बापू जिथे राहतात त्या गच्चीवर हे गाणे चित्रित करण्यात आले. गाणे चित्रित झाल्यानंतर बापू सचिन पिळगांवकर यांना म्हणाले की माझ्या डोक्यावर शूटिंग केले.

या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे थोडे खजील झाले होते. आपला रोल छोटा आहे किंवा प्रेक्षक आपल्याला लक्षात ठेवतील का याची रुखरुख लक्ष्मीकांत बेर्डे यांना होती. पण सचिन पिळगांवकर यांनी त्यांना समजावले. फक्त लक्ष्मीकांतच नाही तर अशोक सराफ, सुधीर जोशी यांच्यासह मोलकरीण तानूचीही भुमिका गाजली.  

वसंत सबनीस यांचा सिंहाचा वाटा

या सगळ्यात वसंत सबनीस यांचा सिंहाचा वाटा आहे. वसंत सबनीस यांनी हा चित्रपट लिहिला. अशोक सराफ यांनी एका मुलाखातीत सांगितले की हल्ली सबनीस यांच्या सारखे लेखकच नाही म्हणून हल्ली असे चित्रपट निघत नाहीत.

असे असले तरी अशी ही बनवा बनवीसाठी मराठी प्रेक्षकांच्या हृद्यात विशेष स्थान आहे. आज मीम्सच्या माध्यमातून या चित्रपटावर लोकांनी प्रेम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या