विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पत्नीने पतीचा गळा चिरला

1269

पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या पतीची गळा चिरून हत्या केली आहे. प्रणाली कदम असे त्या महिलेचे नाव असून तिचा 2011 साली सुनील कदम सोबत प्रेम विवाह झाला होता.

नालासोपारा येथे सुनील कदम हे आई-वडील व पत्नी व दोन मुलींसोबत राहायचे. त्यांची एक मुलगी सात वर्षांची आहे तर एक अवघी आठ महिन्यांची आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास सुनील व प्रणालीचे काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर प्रणालीने स्वयंपाकघरातील सुऱ्याने सुनीलवर सपासप 11 वार केले. तसेच त्यानंतर तिने सुनीलचा गळा देखील चिरला. या हल्ल्यात सुनील जागीच ठार झाला. त्यानंतर प्रणालीने हॉलमध्ये झोपलेल्या तिच्या सासू सासऱ्यांना उठवून सुनीलने स्वत:वर वार करत आत्महत्या केल्याचे सांगितले.

याबाबत प्रणालीचे सासरे आनंद कदम यांनी पोलिसांना कळविले. प्रणालीने जो दावा केला होता तो दावा खोटा असल्याचे सांगत पोलिसांनी तिची चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीनंतर प्रणालीने तिचा गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या