जैन मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडली; ३५ हजार लंपास

83

नाशिक, (सा.वा.)

मालेगाव येथील वर्धमाननगरच्या जैन मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ३५ हजार रुपये लंपास केले. मंदिराशेजारील बंगल्यातही चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वर्धमाननगर भागातील जैन मंदिरात चोरी झाल्याचे आज सकाळी लक्षात आले.

चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीतून ३५ हजार रुपये चोरून नेले. मंदिराशेजारील गोपालकुमार शहा यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात सचिन नवीनचंद शहा यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या