36 डेज; राजकीय घडामोडींचा वस्तुनिष्ठ दस्तऐवज

>> प्रा. डॉ. हरीश नवले

लोकशाहीमध्ये पक्षीय राजकारणाच्या आधारे सत्ता संपादित करावी लागते. पक्षीय राजकारणात पक्षांना व पक्षातील नेत्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. सर्वच पक्ष सत्तास्थापनेची स्पर्धा करताना दिसतात. या स्पर्धेचे काही नियम घटनादत्त आहेत. पण ह्या घटनादत्त नियमांच्या आधारे सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अनेक डावपेच, कारस्थाने व कपट सातत्याने चालू असते. घटनादत्त नियमांचे पालन हे पडद्यासमोर केले जाते. परंतु पडद्यासमोरील नाट्य आqस्तत्वात येण्यासाठी पडद्यामागे प्रचंड मोठ्या आणि वेड्यावाकड्या पद्धतीने घडामोडी सातत्याने घडत असतात.

पक्षीय राजकारणाची नैतिकतेचा प्रश्न वर्तमानात तरी गौण ठरत असताना दिसतो. पक्ष हा काही लोकांचा संच असतो. अशा प्रत्येक संचाचे स्वत:चे वैशिष्ट्य असते. या सर्व संचांचा आणि संच सदस्यांचा संबंध जनतेशी असतो. मतदारांचे प्रतिनिधित्व करतात तेव्हा नेत्यांचे मतदारांशी असलेले नाते नैतिकतेच्या परिघात येते. हिंदुस्थानात होत असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये ही नैतिकता कोणत्या निकषांच्या आधारे सिद्ध होते याचा कोणाला थांगपत्ता आहे असे दिसत नाही. नीती हा शब्द जगाला राज्यशास्त्राचे भारतीय विद्वान कौटिल्य यांनी दिला. त्याने राजकीय नियमांना नीती असे संबोधले. आधुनिक काळात नीतिशास्त्र म्हणजे इंग्रजीतील एथिक्स व मोरालिटी असे समजले जाते. पण ह्या दोन्ही अर्थाने हिंदुस्थानीय राजकारणाची नैतिक चिकित्सा होताना दिसत नाही. राजकीय क्षेत्रातील नैतिकता ही दोन भागात विभागली जाते. एकतर राजकीय व्यक्तीची वैयक्तिक नैतिक आचरण आणि दुसरे महत्वाचे म्हणजे त्याचे सामुहिक नैतिक आचरण. जनतेचे तो प्रतिनिधित्व करतो आणि जनतेच्या सामूहिक डीाग्निटीच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असते म्हणून त्याच्या नैतिक आचारणाला महत्त्व प्राप्त होते. याचे भान कोठे व्यक्त होताना दिसत नाही.

याच पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी जे नाट्य घडले त्यावर सविस्तर माहिती देणारे पुस्तक पेशाने पत्रकार असलेल्या श्री. कमलेश सुतार यांनी लिहिले आहे. त्याचेच नाव ‘36 डेज’ असे आहे. वरील नैतिक आणि राजकारण यांच्या सैद्धांतिक चिंतनात महत्त्वाचा सूक्ष्म डेटा उपलब्ध करून देणारे हे पुस्तक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुस्तकात विशद केलेला पक्षीय मैत्री तुटणे आणि नवीन पक्षीय मैत्री जुळणे यामधील प्रवास हा एखाद्या चित्रपटासारखा आहे. एखाद्या चांगल्या पटकथेची लेखन असते अशाप्रकारे तो लेखकाने रेखाटला आहे. भाजपा सेनेची परस्परांवरील कुरघोडी करत आहेत हे महाराष्ट्रातील 2014 नंतरच्या युती शासनाच्या शेवटपर्यंत लक्षात यायला लागली होते. पण केंद्रातील मोदी सरकार-2 साठी सामोरे जाताना पुन्हा एकदा युतीची बांधणी करून घेण्यात आली. या घटनेच्या सविस्तर वृतांतापासून पुस्तकाची सुरुवात झालेली आहे. नंतर विधान सभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून सेना-भाजपा युती तुटली हे सर्वांना माहीत आहे. ती तुटत असताना तिच्या प्रत्येक धाग्याला कसा तडा जात गेला हा घटनाक्रम सदर पुस्तकात स्पष्ट केलेला आहे.कोणत्या माहितीची बातमी होते याला जसे निकष असतात तसेच कोणत्या घटनेवर पुस्तक लिहिले जाऊ शकते यालाही काही निकष आहेत. महाराष्ट्रात घडलेला सत्ता प्रवास हा पुस्तकाच्या काय पण कादंबरी लिहिण्याच्या आणि चित्रपट बनवण्याच्याही योग्यता आहे. एखाद्या कथेत पुढे एखाद्या नाट्यमय घडामोडीत महत्वाचे ठरणारे पात्र कथेत आधी इन्ट्रोड्युस होते, तसे लेखकाने राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांचे पात्र कथेच्या सुरुवातीला समोर आणले आहे. हा सगळा घटनाक्रम आपल्याला माहिती असतानादेखील लेखकाने ज्या खुबीने हा पट पुढे सरकवला आहे, त्यातून उत्कंठा वाढवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक वेब सिरीज चालू आहेत त्यापैकी एखाद्या दर्जेदार वेबसाईटचे एडििंटग असते तसा घटनाक्रम लेखक मांडण्यात यशस्वी झाला आहे.

जनतेने मतपेटीत बंद केलेला सत्तेचा आदेश हा मतपेटी उघडल्यानंतर महा विकास आघाडीच्या हातात सत्ता जाताना अनेक वळणे घेत हुलकावण्या देत पुढे सरकत होता. रोज ब्रेिंकग न्यूजमध्ये नवीन काहीतरी ऐकायला मिळत होते. ह्या रोजच्या ब्रेिंकग न्यूज मागील घटना अशा घडत होत्या त्या सर्वांचे वर्णन पुस्तक रूपाने एकाच ठिकाणी उपलब्ध होते. या सर्व घडामोडीतूनच राज्याच्या नवीन राजकारणाची सूत्रे विकसित होत गेली. ही निवडणूक जन आशीर्वाद यात्रा, महाजनादेश यात्रा, शिवस्वराज्य यात्रा अशा अनेक नवीन प्रचार मोहिमा नि गाजली. मी पुन्हा येईल, हीच ती वेळ, आमचे ठरले, आमचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री आमचाच होणार इत्यादी घोषणा आणि खा. संजय राऊत यांच्या विशेष शैलीतील रोजच्या लाईव्ह मुलाखती आणि ाqट्वटर्सवरील ट्विट्स यांनी सर्व घटनांना रंगत आणली होती. राऊत यांचे ाqट्वट्स त्याप्रसंगी अत्यंत चर्चेत होते. त्या ाqट्वट्सचा उपयोग कथा पुढे नेण्यासाठी ‘नरेशन’ म्हणून केला आहे, तो दाद देण्याजोगा आहे.

या सर्वांचा क्रमश: तपशीलवार आढावा ‘३६ डेज’मध्ये वाचायला मिळतो. राजकीय मैत्रीची विन विणणे व ती तुटत जाणे यामध्ये विविध स्थळांचेदेखील महत्त्व या दिवसांमध्ये पुढे आले होते. त्यामध्येच सिल्वर ओक इस्टेट, शिवसेनाभवन, मातोश्री, गोिंवदबाग, राजभवन, मैत्री बंगला, टिळक भवन, रिट्रीट हॉटेल, बूनिया रेस्टॉरंट जयपूर, सोफिटेल हॉटेल, लीलावती हॉाqस्पटल, वसंत स्मृती, मोदी बाग, ट्रायडंट हॉटेल, नेहरू सेंटर इत्यादी आणि अशा अनेक सर्व ठिकाणी कोणाच्या बैठका झाल्या आणि त्यात काय ठरले त्यातून सत्तेची विण कशी बनत गेली याचे चित्रण सदर पुस्तकातून उभे राहते. महत्वाचं म्हणजे 36 डेज फक्त एका राजकीय घटनेपुरतं मर्यादित राहत नाही तर या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासातील काही महत्वाच्या घटनांची पुन्हा एकदा उजळणी करते.

36 दिवसांच्या या नाट्याचे काही बीजं याच इतिहासात पेरले गेले असल्याचं आपल्याला वाचायला मिळतं. भाजप-शिवसेना युती तुटणे ही जशी महाराष्ट्रासाठी अनपेक्षित घटना होती तशीच काँग्रेस व शिवसेना, राष्ट्रवादीसह एकत्र येणे हेदेखील अनपेक्षित होते. या सर्व घटनांचा उलगडा करत असताना लेखकाने कमालीची लेखन शिस्त पाळलेली दिसते. स्वत:च्या राजकीय विचार कलांचा लवलेश कोठेही येणार नाही याची लेखकाने दखल घेतली आहे, हे पुस्तक वाचताना जाणवत राहते. म्हणूनच वाचकाला त्याच्या विचार कलाने सर्व घटनाक्रमावर मत व्यक्त करण्यास मदत होईल यासाठी एक वस्तुनिष्ठ माहितीचा दस्तऐवज या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध झाला आहे. गुरुग्राममधील आमदारांची सुटका याचा प्रसंग मजेशीर आहे. अजित पवारांच्या बंडाला झालेली घाई आणि शरद पवारांनी न डगमगता अजित पवारांच्या मागे गेलेले आमदार चुंबकासारखे कसे खेचून आणले याचे वर्णनदेखील पुस्तकात सविस्तर येते. लेखक स्वत: या सर्व घटनांचे एक पत्रकार म्हणून प्रत्यक्ष अवलोकन करून वार्तांकन करत होता त्यामुळे पुस्तकाच्या प्रामाण्याबद्दल कोणतीही शंका राहत नाही.

या सर्व अनपेक्षित घटनाक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस कसे एकटे पडले? ते का पडले असावेत? अजित पवारांना बीजेपीबरोबर नेमके कोणी, कोणत्या कारणासाठी जायला सांगितले? इत्यादी प्रश्नांची नेमकी उत्तरे देऊन लेखकाला खरं तर सनसनाटी निर्माण करता आली असती पण तसं न करता याबाबत अत्यंत रंजक पद्धतीने ते प्रश्न का निर्माण होतात हे ज्या प्रकारे लेखकाने मांडलं आहे ते लाजवाब आहे. भाजपची सत्ता स्थापनेची सर्व अशा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपुष्ट आणली होती. या सर्वोच्च न्यायालयातील केसच्या सुनावणीच्या वेळेस मुकुल रोहतगी, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी कोणते युक्तिवाद केले याचीदेखील सविस्तर वर्णन पुस्तकात वाचायला मिळते आणि त्यामुळे कोर्टाने असा निकाल का दिला? हे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळून जाते.

‘operation kamal is not over yet …’ या वाक्याने पुस्तकाचा शेवट होतो. या वाक्याची आजही वारंवार प्रचिती येते. लोकशाहीत पक्षीय मैत्रीचा विश्वास दाखवून मतदारांकडून मते पदरात पाडून घेतली जातात. त्या उभ्या केलेल्या विश्वासाला मतदानाच्या निकालानंतर कोणतेही अर्थ राहत नाहीत. तसेच आयडिओलॉजीचे सत्तेच्या समोर सर्व दात पडून जाऊन ती सत्तेच्या पुढे कशी लोटांगण घालते याचे भान हे सर्व नाट्य पुस्तक वाचल्यानंतर होते. सत्ता स्थापन होत असताना शेवटी जनतेच्या नव्हे तर नेत्यांच्या भावनांना महत्त्व राहते. त्यांच्या आधारे सत्ता ताब्यात घेतली जाते ह्या घटनाक्रम हे सर्व या घटना क्रमातून वाचकाला वाटायला लागते. यातच नैतिकतेचे मोठे प्रश्न निर्माण होतात. अनुकूल परिस्थितीत जनतेसमोर उभे करून जनतेचे मत पदरात पाडून घेतले जाते नंतर त्या परिस्थितीची सुचिता निकालानंतर नष्ट होते, हे कितपत नैतिक आहे? फक्त मतपेटीचे बटन दाबणे एवढाच जनतेला लोकशाहीमध्ये अधिकार दिला आहे का? लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे हेच का असे असंख्य नेते त्याचे प्रश्न वाचन आणि समोर उभे राहतात. भविष्यात जेंव्हा अभ्यासक या ऐतिहासिक घडामोडींचा अभ्यास करतील तेंव्हा त्यांना एक व्यक्तिनिरपेक्ष आणि वस्तुनिष्ठ माहिती सदर पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध असेल.

पुस्तकाचे नाव : 36 डेज : अ पोलिटिकल क्रोनिकल ऑफ अँबिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अ‍ॅण्ड बिट्रेयल
लेखक : कमलेश सुतार
प्रकाशक : रुपा पब्लिकेशन
किंमत : 295 रु.
अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध

आपली प्रतिक्रिया द्या