राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – रोइंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा

अहमदाबाद येथे होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रोइंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असे महाराष्ट्राच्या महिला रोइंग संघाचे प्रशिक्षक अंबादास तांबे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे खेळाडू उद्या (दि.27) येथून अहमदाबाद येथे रवाना होणार आहेत. तेथे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर यादरम्यान रोर्इंगच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.

या स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक शर्यतीत नाशिकची मृण्मयी शाळगावकर हिच्याकडून चमकदार कामगिरीची खात्री आहे. महिलांच्या क्वाड्रेबल फोर आणि कॉक्स्ड एट या दोन्ही सांघिक विभागातही महाराष्ट्र संघ पदक जिंकेल. असा विश्वास प्रशिक्षक तांबे यांनी व्यक्त केला.