बुलढाणा जिल्ह्यात 36 नवे रुग्ण; 410 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह

642
corona-virus-new-lates

बुलढाण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 446 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 410 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 36 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 10 व रॅपिड टेस्टमधील 26 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 91 तर रॅपिड टेस्टमधील 319 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे एकूण 410 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील 58 वर्षीय पुरूष, 45, 74 व 75 वर्षीय पुरुष, 18 व 20 वर्षीय तरुणी, 45 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगी, मलकापूर येथील 48 वर्षीय महिला, 45, 37 व 38 वर्षीय पुरूष, 12 वर्षीय मुलगा, मिर्झा नगर बुलडाणा येथील 25 वर्षीय पुरूष, सुरभी कॉलनी शेगांव येथील 58 वर्षीय महिला, 72 वर्षीय पुरुष, जमजमनगर शेगाव येथील 17 व 30 वर्षीय महिला, सिंदखेडराजा येथील 65 वर्षीय महिला, जुना जालना रोड देऊळगाव राजा येथील 40 वर्षीय महिला, चिखली येथील 65 वर्षीय महिला आणि पुरुष संशयितांच्या अहवालाचा समावेश आहे. तसेच घाटपुरी खामगाव येथील 21 व 48 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, जलालपुरा खामगाव येथील 17 वर्षीय तरुणी, 10 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरुष, पूरवार गल्ली खामगाव येथील 55 वर्षीय पुरुष, गांधी चौक खामगाव येथील 32 वर्षीय पुरुष, नॅशनल हायस्कूलजवळ खामगाव येथील 38 वर्षीय पुरूष, शिवाजीनगर खामगाव येथील 20 वर्षीय तरुण, शेगाव रोड खामगाव येथील 30 वर्षीय महिला, खामगाव येथील 25 वर्षीय पुरूष व 50 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 36 रूग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारी 12 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये पारपेठ मलकापूर येथील 28 वर्षीय महिला, मेरा ता. चिखली येथील 35 वर्षीय महिला, चिखली येथील 19 वर्षीय मुलगा, कदमपूर ता. खामगाव येथील 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला, दाल फैल खामगाव येथील 23 वर्षीय पुरूष, 43 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 13 वर्षीय मुलगी व 26 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 3970 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 224 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 209 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3970 आहेत. जिल्ह्यात एकूण 385 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 224 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 149 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या