36 केंद्रीय मंत्री कश्मीरमध्ये जाणार हे चिंतेचे कारण, काँग्रेसची टीका

801

केंद्राचे 36 मंत्री कश्मीरच्या दौर्‍यावर जाणार आहेत, हे चिंतेचे कारण असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच कलम 370 हटवणे ही मोठी चूक असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी ट्विटरवरून भाजपवर टीका केले आहे.

तिवारी यांनी ट्विटरवर म्हटले की, 36 केंद्रीय मंत्री कश्मीर दौर्‍यावर जाणार यामुळे भितीचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. तसेच कलम 370 हटवणे ही मोठी चूक होती. त्यामुळे जी उपाययोजना केली होती त्याचे लगेच परिणाम दिसणार नाही असेही तिवारी म्हणाले.

प्राथमिक माहितीनुसार केंद्र सरकारचे 36 मंत्री 18 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान जम्मू कश्मीरचा दौरा करतील. तसेच केंद्र सरकारच्या सर्व योजना ते नागरिकांपर्यंत पोहोचवतील. कलम 370 हटवल्यानंतर सरकारने ज्या योजना राबवल्या होत्या त्यांचा विशेष प्रचार या दौर्‍यात केला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या