बुलढाणा जिल्ह्यात 37 नवे रुग्ण; 197 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

725

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण 234 अहवाल मिळाले आहेत. यापैकी 197 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 12 व रॅपिड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 10 तर रॅपिड टेस्टमधील 187 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 197 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अहवालामध्ये खामगाव शहरातील 56 व 60 वर्षीय महिला तसेच शहरातीलच रेखा प्लॉटमधील 40 वर्षीय पुरूष, सुटाळा 20 वर्षीय महिला, शिवाजीनगर 38 वर्षीय महिला, वाडी भागातील 26, 47 व 70 वर्षीय महिला, शंकर नगरमधील 32 वर्षीय पुरूष, 60 व 54 वर्षीय महिला, पुरूष, 28 व 52 वर्षीय पुरूष, 19, 20, 46 व 60 वर्षीय महिला, दाल फैल भागातील 40 वर्षीय महिला, केला नगरमधील 31 वर्षीय महिला व 6 महिन्याचा मुलगा, मलकापूर शहरातील शिवाजी नगरमधील 28 व 45 वर्षीय पुरूष, मंगल गेट 66 वर्षीय पुरूष व 62 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालांचा समावेश आहे. तसेच चिखली शहरातील 39 व 21 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरूष व 49 वर्षीय महिला, एसबीआय कॉलनी शेगाव येथील 31 वर्षीय पुरूष, दुर्गापुरा दे. राजा येथील 64 वर्षीय महिला, सावजी गल्ली मेहकर येथील 24 वर्षीय पुरूष, करवंड ता. चिखली येथील 40 वर्षीय पुरूष, उल्हास नगर मुंबई येथील असलेले 45 वर्षीय पुरूष, गुळभेली ता. मोताळा येथील 47 वर्षीय पुरूष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 37 नवे रूग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात रविवारी 17 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये जळगाव जामोद येथील 50 वर्षीय महिला, जोगडी फैल शेगाव येथील 4 वर्षीय मुलगा व 30 वर्षीय महिला, नांदुरा येथील 37 वर्षीय महिला, समर्थ नगर खामगाव येथील 53 वर्षीय महिला, घासलेटपुरा नांदुरा येथील 10,12 व 13 वर्षीय मुलगी, 45 व 24 वर्षीय पुरूष, 6 वर्षीय मुलगा, दाल फैल खामगाव येथील 75 वर्षीय महिला, टेंभुर्णा ता. खामगाव येथील 20 वर्षीय पुरूष, फाटकपुरा खामगाव येथील 54 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय महिला आणि मूळ पत्ता बोदवड जि. जळगाव असलेल्या 24 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 4578 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 252 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात 128 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 4578 आहेत. जिल्ह्यात एकूण 482 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 252 कोरोनाबाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 213 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या