धक्कादायक! ट्रकमध्ये सापडले 39 मृतदेह

2040
file photo

मालवाहतूक करणाऱ्या एका मोठ्या ट्रकमध्ये एका बालकासह 39 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमधील एसेक्स शहरातील इंडस्ट्रीयल पार्कजवळ हा ट्रक सापडला असून ट्रकमधील मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

या प्रकरणी इस्सेक्स पोलिसांनी तपास सुरू केला असून दक्षिण आर्यलँडमधून एका 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने त्या सर्वांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्या पोलीस मृतदेहांची ओळख पटविण्याचा देखील प्रयत्न करत आहे.

पोलिसांना तो ट्रेक बल्गेरिया वरून आल्याचा देखील संशय व्यक्त केला आहे. तसेच मानवी अवयवांच्या तस्करीसाठी त्यांची हत्या झाली असावी अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या