परळीत 4 तर अंबाजोगाईत 1 रुग्ण आढळला; 340 अहवाल निगेटिव्ह

783

बीड जिल्ह्यात रविवारी 345 जणांच्या सॅम्पलचा अहवाल मिळाला. यामध्ये पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहेत यात चार परळीतील तर एक अंबाजोगाईत आढळला आहे, अजूनही 628 व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बीड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात रविवारी 345 जणांचा अहवाल मिळाला असून 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात चार जण परळीमधील तर एकजण अंबाजोगाईमधील आहे. अजूनही 628 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रात्री उशिरा उर्वरित अहवाल मिळण्याची शक्यता आहे. परळीमध्ये अजून चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. परळीत कोरोना झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

आता विवाहासाठी फक्त 10 व्यक्ती
कोरोनाचा फैलाव विवाहाच्या कार्यक्रमातून होत असल्याचे दिसून येत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी आदेश काढून विवाहासाठी केवळ 10 व्यक्ती उपस्थित राहू शकतात ,असा आदेश काढला आहे. यापूर्वी ती मर्यादा 50 व्यक्तींची होती.

आपली प्रतिक्रिया द्या