अमरावती जिल्ह्यात तरसाच्या हल्ल्यात चार आदिवासी जखमी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या धारणी तालुक्यात तरसाने हल्ला केल्यामुळे चार आदिवासी जखमी झाले आहेत. साद्रावाडी परिसरात ही घटना घडली. मंगळवारी सकाळी बिवामल पाथरपूर परिसरात बिबट्यासारखा दिसणाऱ्या तरसाने धुमाकुळ घातला.

तरसाच्या हल्ल्यात साबुलाल कास्देकर या आदिवासी युवकाचे कान ओरपुन तोडले तसेच समीता दहीकर, रमेश जांभेकरसह एकूण 4 आदिवासींना जखमी केले. जखमीवर साद्रावाडी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या