जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये 4 दहशतवाद्यांना अटक; गटाच्या म्होरक्याचाही समावेश

1010

जम्मू-कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. हिंदुस्थानी लष्कराच्या 53 आरआर पथक आणि बडगाम पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहिम हाती घेतली होती. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दहशतवाद्यांचा म्होरक्या वसीम गनी याचाही समावेश आहे.

बडगाममधील बीरवा परिसरात लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी रविवारी सकाळी एकत्रितपणे शोधमोहिम हाती घेतली होती. दहशतवादी असलेल्या परिसराची नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत होता. या कारवाईत सुरक्षा दलाने शिताफीने चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यात दहशतवाद्यांचा म्होरक्या वसीम गनीलाही सुरक्षा दलाने अटक केली आहे. तो लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा मिलिटेंट असोसिएट आहे. या परिसरात लश्करच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यासह इतर मदत हा गट करत होता. त्याचप्रमाणे परिसरात दहशतवाद प्रस्थापित करण्यासह तरुणांना दहशतवादाकडे वळवण्याचे कामही या गटाकडून करण्यात येत होते. त्यामुळे या कारवाईत दहशतवाद्यांना झालेली अटक हे सुरक्षा दलाला मिळालेले मोठे यश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या