संभाजीनगर – चार वर्षांची चिमुकली कोरोनामुक्त

छायाः योगेश लोंढे

संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयातून आज कोरोनामुक्त झालेल्या चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये नूर कॉलनी येथील या चार वर्षीय मुलीचा समावेश होता. डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून या मुलीला निरोप दिला. आपण कुठल्या संकटातून बाहेर पडलोय हे त्या बालिकेस ठाऊक नसले तरी आपल्यासाठी वाजणाऱ्या टाळ्या ऐकून तिचे बालमन हरखून गेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या