मातृदिनी जीवाला चटका लावणारी घटना,मातेने गमावला ४ वर्षांचा मुलगा

22

सामना ऑनलाईन, कल्याण

शनिवारी संध्याकाळी एका विचित्र घटनेमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचा जीव गेला. मयांक वैश्य हा मुलगा संध्याकाळी खेळायला खाली उतरला होता. तो ज्या इमारतीमध्ये राहत होता त्या भूमी कॉम्प्लेक्स इमारतीचं गेट काही कारणामुळे काढून ठेवलेलं होतं. खेळता खेळता मयांक त्या गेटपाशी पोहोचला आणि त्याचा गेटला धक्का लागला, यामुळे हे गेट त्याच्या अंगावर पडलं, ज्यात तो जबर जखमी झाला होता. त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मातृदिनी या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या