‘रमजान’ महिन्यात गेलेली वाचा ‘बकरी ईद’ला परत मिळाली, चिमुरडीच्या मदतीला एम्समधील ‘देव’ धावले

बिहारमधील एका चार वर्षीय चिमुरडीची रस्ते अपघातामध्ये वाचा गेली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला होता. उभ्या आयुष्यात आपल्या मुलीची वाचा पुन्हा येईल असे त्यांना वाटलेही नाही. परंतु पाटणा येथील एम्समधील डॉक्टर देवासारखे धावून आले तीन महिन्यामध्ये चिमुरडी पुन्हा बोलू लागला. विशेष म्हणजे रमजान महिन्यामध्ये चिमुरडीची वाचा केली होती आणि बकरी ईदला त्यांची गेलेली वाचा परत आणत डॉक्टरांनी कुटुंबियांना खास भेट दिली.

पाटणाच्या पालीगंज येथे एका रस्ते अपघातानंतर चार वर्षीय तैयबा हसन या मुलीची बायलॅटरल व्होकल कॉर्ड पॅरालिसीसमुळे वाचा गेली होती. जवळपास तीन महिन्यांपासून तिच्यावर पाटणातील एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत बकरी ईदपर्यंत त्याची वाचा परत आणली.

डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बकरी ईदच्या खास दिवशी तैयबा हिच्या काकांनी तिच्याकडून एक गाणेही गाऊन घेतले. याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. 17 एप्रिल 2022 पासून तिच्यावर उपचार सुरू होते. मुलीची वाचा पुन्हा आल्याने कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभारही माले.

अचानक वाचा गेल्याने मुलीच्या ओठांच्या हालचालीवरून तिला काय म्हणायचे हे ओळखावे लागत होते. परंतु आता ती पूर्वीप्रमाणे बोलू लागली आहे. ईद-उल-फितरच्या वेळी झालेल्या अपघातामुळे तिची वाचा गेली होती आणि ईद-उल-अजहाला तिची वाचा पुन्हा आली आहे.