नगर जिह्यात बीओटी तत्त्वावर 40 शाळा बांधणार

नगर जिल्हा परिषदेचे 2023-24 चे 48 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सादर केले असून, 46 लाखांचे शिलकीचे आहे. यामध्ये नव्या 40 शाळा बीओटी तत्त्वावर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे, मनोज ससे, डॉ. संदीप सांगळे, भास्कर पाटील, पांडुरंग गायसमुद्रे, संजय कुमकर, राधाकिसन देवढे, शंकर किरवे, राजू लाकडूझोडे, योगेश आमरे, संजय आगलावे, भगवान निकम आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे सन 2022-23 चे मूळ महसुली अंदाजपत्रक 36 कोटी 69 लाख रुपयांचे असून, सन 2022-23चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक रक्कम रुपये 38 कोटी 76 लाखांचे आहे. सन 2023-24 चे मूळ अंदाजपत्रक रक्कम रुपये 39 कोटी 13 लाख असून, हे अंदाजपत्रक रक्कम रुपये 46 लाख शिलकीचे आहे.

या अंदाजपत्रकात  प्रशासन 1 कोटी 29 लाख 63 हजार, सामान्य प्रशासन विभाग 93 लाख 81 हजार, शिक्षण विभाग 1 कोटी 19 लाख, बांधकाम उत्तर 4 कोटी 28 लाख, बांधकाम दक्षिण 6 कोटी 75 लाख, लघु पाटबंधारे विभाग 1 कोटी 6 लाख, ग्रामीण पाणीपुरवठय़ासाठी 3 कोटी 30 लाख, आरोग्य 77 लाख, कृषी 80 लाख, पशुसंवर्धन 1 कोटी 29 लाख, समाजकल्याण 2 कोटी 54 लाख, दिव्यांग कल्याण 60 लाख, महिला बालकल्याण 1 कोटी 20 लाख, ग्रामपंचायत विभाग 8 कोटी 86 लाख, अर्थ विभाग 1 कोटी 13 लाख असा विविध विभागांना निधी देण्यात आला आहे.

2023-2024 मध्ये अपेक्षित महसुली जमा होणारा निधी

 स्थानिक उपकर / वाढीव उपकर- 2 कोटी 50 लाख, मुद्रांक शुल्क-15 कोटी, उपकर सापेक्ष अनुदान- 2 कोटी, अभिकरण शुल्क- 30 लाख, गुंतवणुकीवरील व्याज- 11 कोटी 30 लाख, इतर जमा- 7 कोटी 40 लक्ष असे एकूण महसुली जमा- 38 कोटी 50 लाख असे एकूण 38 कोटी 50 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्टय़े

कृषी आणि समाजकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांसाठी  500 कडबाकुट्टी यंत्रांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. n बांधकाम विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा संरक्षित करण्यासाठी रक्कम 1 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद. n जि.प. रस्ते व मोऱयांसाठी रक्कम 4 कोटी 60 लाखांची तरतूद. n शिक्षण विभागासाठी ग्रंथालय पुस्तक खरेदीसाठी रु. 30 लाखांची तरतूद. n महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध विकासकामांसाठी 28 लाख 60 हजार तरतूद. n ग्रामपंचायत विभागामार्फत जिल्हा प्रशिक्षण व संसाधन केंद्रासाठी रक्कम 40 लाख रुपये तरतूद करण्यात आली असून, उत्कृष्ट ग्रामपंचायतीसाठी 25 लाखांची तरतूद. n आरोग्य विभागामार्फत एकुलती एक लाडाची लेक (एका मुलीवर शस्त्र्ाक्रिया) – 5 लाखांची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. n जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या मालकीच्या अनेक जागा आहेत, यामध्ये इमारतींची संख्या 993 आहे, तर 3773 रस्ते आहेत, तर ओपन स्पेस किंवा इतर जागा अशा 8652 आहेत. या जागांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या बजेटमध्ये दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. n जिल्हा परिषदेला स्वतःचे उत्पन्न मिळावे, या उद्देशाने आता संपूर्ण जिह्यामध्ये 40 शाळा बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणार आहेत. जिह्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या 32 शाळा आहेत. दोन लाख 18 हजार विद्यार्थी यामध्ये शिक्षण घेत आहेत. 11,000 शाळा खोल्या असून, यातील 8000 शाळा खोल्या या दुरुस्त करण्यासाठी यामध्ये विशेष तरतूद करण्यात आली  आहे.