श्रीरामपूर – रूळ ओलांडताना रेल्वे इंजिनाच्या धडकेत 40 मेंढ्या ठार

513

रेल्वे इंजिनच्या धडकेत रूळ ओलांडत असलेल्या 40 मेंढ्या ठार झाल्या. हा अपघात वाकडी (ता. राहता) शिवारात घडला.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील वाकडी (ता. राहता) शिवारातील यशवंतबाबा चौकी परिसरातील भुयारी मार्गासमोरुन मेंढपाळ मेंढ्या चारत होता. सदर मेंढ्या रूळ ओलांडताना समोरुन आलेल्या रेल्वे इंजिनच्या जोराच्या धडकेत 40 मेंढ्या जागीच ठार झाल्या. सदर इंजिन विना रेल्वे डब्याचे असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले.

दरम्यान, अपघातात 40 मेंढ्याचा मृत झाल्याने मेंढपाळाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. मेंढपाळाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या