दक्षिण कोरियातील रुग्णालयाला आग, ४१ जणांचा भाजून आणि गुदमरून मृत्यू

21

सामना ऑनलाईन, मिलयांग

दक्षिण कोरियातील एका रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये ४१ जणांचा मृत्यू झालाय तर ७० पेक्षा अधिक जण जखमी झालेत. यातल्या ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं तिथल्या स्थानिक वृत्तसंस्था ‘योनहॅप’ ने वृत्त दिलं आहे.

सेजाँग हॉस्पीटलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी कक्षामध्ये ही आग लागली आणि नंतर ती संपूर्ण हॉस्पीटलमध्ये पसरली असं सांगितलं जात आहे. आग लागली तेव्हा १०० हून अधिक रूग्ण रुग्णालयात होते असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आग विझवणं आणि आत मध्ये अडकलेल्यांची सुटका करणं अशी दुहेरी आणि जोखमीची कामगिरी अग्निशमन दलाच्या जवानांना पार पाडावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या