आश्चर्य! ‘या’ महिलेच्या पाकिटात होते 41 लाख रुपये, मात्र तिला कळले तेव्हा…

एखादी मौल्यवान वस्तू सोबत घेऊन आपण प्रवास करतोय, पण याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही, असे अनेक वेळा घडू शकते. अशाच प्रकारची घटना एका अमेरिकन महिलेसोबत घडली आहे. या महिलेने जिंकलेल्या लॉटरीच्या तिकिटाबाबत तिच्यासोबत घडलेली कथा मोठी रंजक आहे.

अमेरिकेतील सेंट लुईस येथील मिसूरी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या बाबतीत ही घटना घडली आहे. 16 जुलै रोजी या महिलेने मँचेस्टरच्या दुकानातून एक लॉटरीचे तिकिट खरेदी केले होते. काही दिवसांनी तिने लॉटरीचे तिकिट विकत घेतले आहे, याचा तिला विसर पडला. त्यामुळे ती ज्या दुकानातून हे तिकिट खरेदी केले होते, त्या दुकानातही गेली नाही. काही महिन्यांनी जेव्हा ती एका दुकानात गेली तेव्हा तिला तिने विकत घेतलेल्या लॉटरीच्या तिकिटाची आठवण झाली. यामुळे तिने खूप वेळ लॉटरीचे तिकीट शोधले. तिकिट सापडल्यावर ती दुकानात गेली, तेव्हा तिला कळले की, ती लॉटरीचे तिकीट जिंकली होती.

लॉटरीचा निकाल कळल्यावर तिला खूपच आश्चर्यचकित झाली. कारण पर्समध्ये ठेवलेले लॉटरीचे तिकिट हिंदुस्थानी चलनानुसार 41 लाख 23 हजार रुपयांचे होते आणि ही लॉटरी आपण जिंकलो आहोत, याविषयी तिला बरेच महिने काहीच माहिती नव्हते. म्हणजे पर्समध्ये एवढे पैसे ठेवून ती फक्त अजाणतेपोटी भटकत होती. जेव्हा आपल्याला काहीतरी मिळावे, या अपेक्षेने आपण वाटचाल करतो, मात्र बऱ्याचदा हाती काहीच लागत नाही, मात्र अशाच वेळ एक क्षण असा येतो की, अपेक्षा नसतानाही आयुष्यच उजळून निघते, असे तिच्या बाबतीत घडले होते. त्यामुळे तिच्या या विजयाचा तिला अतिशय आनंद झाला.