मध्य प्रदेशमध्ये मंत्रीमंडळ विस्तार, सरकारमध्ये 41 टक्के मंत्री काँग्रेसमधून आलेले

मध्य प्रदेशमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. राज्य सरकारमध्ये 41 टक्के मंत्री हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षातील होते. नुकतंच त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.


मध्य प्रदेश राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात सर्वाधिक फायदा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गोटातील आमदारांना झाला आहे. शिवराज सिंह सरकरमध्ये एकूण 34 मंत्री आहेत. सर्व मंत्री 2018 च्या निवडणुकीत भाजप तिकीटावर जिंकले होते. तर 41 टक्के आमदार म्हणजेच 14 मंत्री हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. 14 मंत्री आमदार नाही. मध्य प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे जिथे 14 मंत्री आमदारही नाही. या विस्तारात सर्वाधिक फायदा सिंधिया समर्थकांना झाला आहे. कमलनाथ सरकारमध्ये 6 मंत्री सिंधिया समर्थक होते. सध्या शिवराज सरकारमध्ये 11 मंत्री हे सिंधिया समर्थक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या