41 वर्षांची शिक्षिका गर्भवती झाली, बाळाच्या पित्याचे वय ऐकाल तर हादरून जाल!

शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे गुरु-शिष्याचं नातं असतं. पण, त्या नात्याला काळिमा फासल्याचा आरोप एका शिक्षिकेवर ठेवण्यात आला आहे.

ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा इथली आहे. पोलिसांनी येथील हेरी क्लॅवी नावाच्या 41 वर्षांच्या शिक्षिकेला अटक केली आहे. हेरी ही 8 महिन्यांची गर्भवती आहे. तिच्यावर स्वतःच्याच 15 वर्षांच्या विद्यार्थ्याशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

तिच्यावर विद्यार्थ्यांप्रति निष्काळजी वर्तणूक आणि शाळेत बंदूक आणण्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. तसंच, पीडित मुलाच्या फोनमध्ये त्याचे आणि हेरीचे अश्लील व्हिडीओ सापडले आहेत.

पण, पीडित मुलाच्या म्हणण्यानुसार, हेरीने त्याचं लैंगिक शोषण केलं नाही. जे काही घडलं ते त्याच्या सहमतीनेच घडलं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. अर्थात अद्याप डीएनए चाचणी झाली नसून ती झाल्यावरच पुढील कारवाई होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या